Rani Phadakti Lakho Zende Lyrics From marathi movie – Fatteshikast

Rani Phadakti Lakho Zende song is sung by Ajay Purkar and Ashutosh Mungle. Devdutta Manisha Baji has directed the music while Vishnu Sakharam Khandekar has written the Rani Phadakti Lakho Zende Lyrics in Marathi. The song is from the Digpal Lanjekar directed Marathi feature film Fatteshikast starring Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni, Ruchi Sarvan and Anand Deshpande.

रणी फडकती लाखो झेंडे
अरुणाचा अवतार महा
अरुणाचा अवतार महा

रणी फडकती लाखो झेंडे
अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्रीविष्णूपर
भगवा झेंडा एकचि हा

शिवरायाच्या द्रीढ वज्राची
सह्याद्रीच्या हृदयाचि
दर्या खवळे तिळभर न ढळे
कणखर काठी झेंड्याची

तलवारीच्या धारेवरती
पंचप्राणा नाचविता
पाश पटापट तुटती त्यांचा
खेळे पट झेंड्यावरचा

लीलेने खंजीर खुपसता
मोहक मायेच्या हृदयी
अखंड रुधिरांच्या धारांनी
ध्वज सगळा भगवा होई

रणी फडकती
रणी फडकती लाखो झेंडे
अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्रीविष्णूपर
भगवा झेंडा एकचि हा

ह्या झेंड्याचे हे आवाहन
महादेव हरहर बोला
महादेव हरहर बोला
उठा उठा हो अंधारावर
घाव निशाणीचा घाला

ह्या झेंड्याचे हे आवाहन
महादेव हरहर बोला
उठा उठा हो अंधारावर
घाव निशाणीचा घाला

वीज कडाडुन पडता तरुवर
कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता पत्थर फुटती
डोंगर मातीला मिळती

झंजावाता पोटी येउन
पान हलेना हाताने
कलंक असला धुवुन काढणे
शिवरायाच्या राष्ट्राने

रणी फडकती
रणी फडकती लाखो झेंडे
अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्रीविष्णूपर
भगवा झेंडा एकचि हा

Rani Phadakti Lakho Zende Song Details:
Singer: Ajay Purkar & Ashutosh Mungle
Music: Devdutta Manisha Baji
Song Writer: Vishnu Sakharam Khandekar